राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी शरद पवार आज ईडी कार्यालयात

राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी शरद पवार आज ईडी कार्यालयात

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शरद पवार स्वत: मुंबईतील ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. शरद पवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खबरदारीसाठी पोलिसांना जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.

पवार आज ‘ईडी’ कार्यलयात –

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतील ईडीच्या कार्यलयात उपस्थित राहणार आहे.

दुपारी 2 वाजताच्या सुमारास ईडीच्या कार्यलयात हजर राहणार आहेत.

मात्र ईडीने चौकशीसाठी पवारांना समन्स बजावलेले नसल्याने प्रवेश नाकारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

पवारांची बॅंक गैरव्यवहारप्रकरणी पत्रकार परिषद  –

शिखर बॅंक प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.

माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे मंगळवारी संध्याकाळी कळालं असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्र हे शिव छत्रपतींचे राज्य आहे.

कारवाईचा आयुष्यतला दुसरा प्रसंग असल्याचे पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, प्रचारासाठी मी मुंबईच्या बाहेर जाणार असल्यामुळे मी इथे नाही असे EDला वाटू नये.

त्यामुळे शरद पवार ईडीने चौकशीसाठी समन्स न बजावताही ईडीसमोर हजर राहणार असल्याचे पवार म्हणाले.

पवारांचे कार्याकर्त्यांना आवाहन –

कायर्त्यांनी आणि समर्थकांनी ईडी कार्यलयाबाहेर उपस्थित राहून गर्दी करू नये.

राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे असे ट्विट करत पवारांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version