मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांच्या प्रयत्नांना शरद पवारांच्या शुभेच्छा

मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांच्या प्रयत्नांना शरद पवारांच्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत एक मराठा, लाख मराठाचा आवाज दुमदुमला. हा मोर्चा जरी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा नसला तरी अनेक राजकिय नेते मात्र त्यास पाठिंबा

दर्शवतांना दिसत आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मोर्चेकऱ्यांच्या प्रयत्नांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

 

शरद पवारांनी केलेले ट्वीट 

 

– आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा हा अत्यंत शांततेने होत आहे आणि आपली भूमिका मोर्चेकरी शासनाकडे मांडतील याचा मला विश्वास आहे.

– राजर्षी शाहू महाराजांची मराठा समाजहिताची संकल्पना व अन्य अठरापगड जाती-जमातीच्या प्रश्नालाही सकल मराठा विचारांची साथ राहील.

– या सर्वसमावेशक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पाउले टाकली जातील, अशी माझी सरकारकडून अपेक्षा आहे.

– मोर्चेकऱ्यांच्या या सर्व प्रयत्नांना माझ्या मनापासून शुभेच्छा!

त्याचप्रमाणे मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, ही सदिच्छा!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version