‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’; शरद पवारांची शिवसेनेवर टीका

‘नांदता येत नसेल तर वेगळं व्हावं’; शरद पवारांची शिवसेनेवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

‘शिवसेना फसव्या लोकांबरोबर राहते  कशाला, जर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा.’ अशी थेट टीका शरद पवारांनी शिवसेनेवर केली आहे. नुकतीच भाजप सरकार फसवं असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला.

शरद पवार कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘भाजप सरकार फसवे आहे हे उद्धव ठाकरे म्हणतात हाच मोठा विनोद आहे. फसव्या लोकांबरोबर तुम्ही राहता कशाला? अशा शब्दांत पवारांनी शिवसेनेवर टीका केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version