शिवसेनेनं फोडाफोडीच राजकारण केलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं म्हणत शरद पवारांनी साधला भाजपवर निशाणा

शिवसेनेनं फोडाफोडीच राजकारण केलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही असं म्हणत शरद पवारांनी साधला भाजपवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेनं फोडाफोडीच राजकारण केलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही भाजपनं देखील हेच राजकारण पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये केले. सेनेनं फक्त जशाच तसं उत्तर दिल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय.

सोशल मीडियावर सरकारविरोधात लिहणाऱ्या तरुणांसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत. या सर्व तरुणांना सरकारविरोधी लिखाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावलीय.

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. मात्र, मत व्यक्त केल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागतय असं शरद पवार म्हणालेत. तसेच याबाब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version