‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दया; शरद पवारांची मागणी

‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दया; शरद पवारांची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कापसावरील बोंड आळीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास मातीमोल झाला. सरकार काही केल्या यासंदर्भात पावलं उचलत नसल्यानं शेतकरी हवालदील झालाय.

“बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दया” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केलीय.

त्याचबरोबर कापसाच्या सदोष बियाणे पुरवठयाबाबतही काही तक्रारी आहेत. याचा परिणाम किफायतशीर असणारे कापसाचे नगदी पीक गमावण्याची पाळी शेतकऱ्यांवर आलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version