…तर राष्ट्रवादी पूर्णपणे तयार आहे – शरद पवार

…तर राष्ट्रवादी पूर्णपणे तयार आहे – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लोकांना सध्याच्या राज्यकर्त्यांबाबत विश्वास राहिलेला नाही. त्यांना पर्याय हवा आहे. हा पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस आहे. असे लोकांना वाटत असेल तर आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हंटले आहे.

शरद पवार सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा या जिल्ह्यांना त्यांनी भेटी दिल्या.

यानिमित्ताने विविध घटकांतील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. समस्या ऐकून घेतल्या. सत्तेत नसल्याने त्या सोडवता येत नाहीत. पण त्यासाठी सरकारशी संवाद नक्कीच साधेन असे पवार यावेळी म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version