शनाया येतेय परत…!

शनाया येतेय परत…!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून जेव्हा जून्या शनायाची एक्झिट झाली तेव्हा हजारो चाहते नाराज झाले होते. तिच्या जागी जेव्हा नवीन शनाया म्हणजेच इशा केसकर आली तेव्हा प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती. शनाया बदलल्यामुळे मालिकेचा टिआरपी देखील कमी झाला होता. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की,  शनाया म्हणजेच रसिका सुनील परत येतीय.

रसिकाला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जावं लागलं आणि त्यासाठी तिने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडली होती. पण आता रसिकाला तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकणार आहे. रसिका परत येतीय ही गोष्ट जरी खरी असली तरी आता एका अनोख्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. रसिका नवऱ्याची बायको या मालिकेद्वारे नाही तर एका चित्रपटाच्या माध्य़मातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तिचा ‘गॅटमॅट’ हा चित्रपट 16 नोव्हेंबरला येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे कलाकार आहेत. कॉलेज तरुण-तरुणींचं प्रेम जुळवून देण्यासाठी दोन मित्र रंग्या आणि बगळ्या स्वत:ची एजन्सी सुरू करतात. ही कथा त्यांच्याच अवतीभोवती फिरते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्य़ेच एवढी मस्ती दाखवण्यात आली आहे की अगदी त्यांची रवानगी तुरुंगात होते.

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version