उत्तरप्रदेशमध्ये शंक्तीपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रुळावरुन घसरले

उत्तरप्रदेशमध्ये शंक्तीपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रुळावरुन  घसरले

वृत्तसंस्था, उत्तरप्रदेश

 

रेल्वे अपघातांचे सत्र अद्याप सुरुच आहे. उत्तर प्रदेशमधील उत्कल एक्स्प्रेसच्या अपघाताची घटना ताजी असतांनाच उत्तर प्रदेशला आणखी एका

एक्स्प्रेसच्या अपघाताने हादरुन टाकले आहे.  उत्तर प्रदेशमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे गुरुवारी सकाळी रुळावरुन घसरले  आहेत. 

 

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथे हा अपघात झाला आहे. शक्तीपुंज एक्स्प्रेस हावडाहून जबलपूरच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला. अपघातात

कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सुदैवाने सगळे बचावल्याने मोठी हानी टळली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version