आज देशभरात ईद मोठ्या धुमधड्याक्यात साजरी केली जात आहे. अशातच किंग खान अर्थात बॉलीवूड अभिनेता शाह रुख खान याने ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. शाहरुखचे अनेक चाहते ईदच्या निमित्ताने त्याच्या मन्नत या बंगल्याखाली दरवर्षी येतात. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना भेट दिली.
So lovely to see you all on this festive day!!! Now let’s spread the love… and may God’s blessings be upon all of us… Eid Mubarak. pic.twitter.com/P7eYPmgSko — Shah Rukh Khan (@iamsrk) April 22, 2023
आज सकाळपासून मनात बंगल्याबाहेर शाहरुख च्या अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती.शेवटी शाहरुखने आपल्या चाहत्यांना निराश न करता बंगल्याबाहेर येत आपल्या चाहत्यांची भेट घेतली आणि त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यावेळी शाहरुखने पांढऱ्या रंगाच्या टिशर्ट घातला होते. आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करून एकप्रकारे शाहरुख खानने चाहत्यांना खास गिफ्टच दिले आहे. शाहरुखला पाहून सकाळपासून आपल्या आवडत्या अभिनेत्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा आनंद गगनाद मावेनासा झाला.
लवकरच शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानंतर लगेचच त्याचा जवान हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच त्याचा पठान हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला,पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. त्यांनतर आत सगळ्यांच्या नजरा त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाकडे आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.