शाहरुख खानचा मुलगा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज!

शाहरुख खानचा मुलगा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज!

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. आणि आता त्याचा मुलगा आर्यनही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचा मित्र आणि बॉलिवूड स्टार्सच्या मुलांना यशस्वीरीत्या लाँच करण्याबद्दल ओळखला जाणारा करण जोहरच आर्यनला लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात आर्यन खानची हिरोइन असणार आहे ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर.

श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर याचवर्षी धडक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. लोकांनी तिला पसंतही केलं. तिला लॉन्च करणा-या करण जोहरनेच तिच्या बहिणीला लॉन्च करायचं ठरवलंय. खरंतर आर्यन आणि खुशी यांचं शिक्षण अजूनही पूर्ण झालेलं नाही. मात्र तरीही आपला अभ्यास सांभाळून ते आता अभिनय आणि इतर गोष्टींचंही प्रशिक्षण घेऊ लागले आहेत. या दोघांचं पदार्पण अगदी दमदार व्हावं, यासाठी करण जोहरही एका हटके कथेच्या शोधात आहे.

आर्यन खान आणि खुशी कपूर हे आधीच आपल्या सेलिब्रिटी पालकांमुळे प्रसिद्ध आहेत.

चाहतेही त्यांच्या सिनेमाची वाट पाहात आहेत. आता या दोघांनाही त्यांच्या आई-वडिलांप्रमाणेच प्रेक्षक डोक्यावर घेतात का, हे चित्रपट आल्यवरच कळेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version