काँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार

काँग्रेसला बैठकीसाठी जागा देण्यास सेवाग्राम आश्रमाचा नकार

महात्मा गांधींच्या जयंती निमित्त काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक 2 ऑक्टोबरला सेवाग्राम इंथ घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता.

सेवाग्रामला बैठक आयोजित करुन महात्मा गांधी यांना अभिवादन करायची कॉ़ग्रेसची भूमिका होती.

मात्र आता 2 ऑक्टोबरला आश्रमात ही बैठक होणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसच्या बैठकीसाठी जागा देण्यास आश्रमानं असमर्थता दाखवल्यानंतर हा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

त्यामुळे आश्रमात फक्त प्रार्थना घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

आश्रमात कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला जागा दिली जात नाही हा आश्रमाचा नियम आहे.

म्हणून दुसऱ्या जागेवर बैठक घेण्याची तयारी काँग्रेसकडून सुरु करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version