वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टेनिसस्टार सेरेना विल्यम्सकडे गूड न्यूज आहे. सेरेनानं गरोदर असल्याचा फोटो स्नॅपचॅटवर शेअर केला. ज्यावर 20 वीक्स असं कॅप्शनही आहे. याचा अर्थ ती 20 आठवड्यांची गर्भवती असल्याचे संकेत मिळत आहेत.
म्हणजेच गरोदर असतानाच तिनं जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेरेनाने रेडिटचा सहसंस्थापक अॅलेक्स ओहॅनियनसोबत साखरपुडा झाल्याची बातमी तिनं सोशल मीडियावरून दिली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.