रुपयाची विक्रमी घसरण! शेअर बाजार 850 अंकांनी कोसळला

रुपयाची विक्रमी घसरण! शेअर बाजार 850 अंकांनी कोसळला

कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाल्याने याचा फटका शेअर बाजाराला पुन्हा एकदा बसला. सेन्सेक्समध्ये 850 अंकांची घसरण झाली असून निफ्टीही 11 हजारांच्याखाली गेला आहे.

शेअर बाजाराच्या आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 1.79 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारात घसरण झाल्याने एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयटीसी, विप्रो, एनपीटीसी, सन फार्मा, रिलायन्स, एशियन पेंट, भारती एअरटेल, कोटक बँक, मारुती, अॅक्सिक बँक, टीसीएसला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. 

सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचा सर्वाधिक फटका ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला बसला. महिंद्राचे 6.80% शेअर पडले. 

डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळाली. एका डॉलरसाठी 73 रुपये 34 पैसे मोजावे लागणार आहेत. रुपयांची ही आतापर्यंतची सर्वाधिक निच्चांकी घसरण आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version