IAS Tukaram Mundhe : IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, 21 वर्षात 25 वेळा झाली ट्रान्सफर, आता या ठिकाणी प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्ती

आपल्या कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे.
IAS Tukaram Mundhe :  IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, 21 वर्षात 25 वेळा झाली ट्रान्सफर, आता या ठिकाणी प्रशासकीय अधिकारीपदी नियुक्ती

आपल्या कर्तव्यकठोर आणि शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे 'सिंघम' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली झाली असून पुन्हा दीड महिन्यात तुकाराम मुंढे यांच्यावर आता अन्न आणि औषध प्रशासनया संवेदनशील विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये मुंढे यांच्यासह अन्य चार महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शासनाने लवकरात लवकर कार्यभार स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यात तब्बल एक दोन नव्हे तर तब्बल 25 वेळा बदली करण्यात आली आहे. यापूर्वी ते मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी देखील होते. आता याच विभागात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यामुळे विभागातील भ्रष्टाचाराला आणि गैरव्यवहारांना चाप बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- Water Shortage In Maharashtra : राज्यातील 15 जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई; विविध जिल्ह्यांमध्ये 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा, ठाणे जिल्हा अग्रेसर
कोण आहेत तुकाराम मुंढे?  
2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची ओळख एक निर्भीड आणि पारदर्शक अधिकारी म्हणून आहे. त्यांच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. मुंढे यांच्या बदल्यांची नेहमीच चर्चा होत आली आहे. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे अनेकदा राजकीय संघर्ष निर्माण होऊन त्यांच्या बदल्या झाल्या, तरीही त्यांनी आपल्या कामाची पद्धत बदलली नाही. नुकतीच त्यांची मंत्रालयात प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ अत्यंत गाजला. त्यांनी नेहमीच भ्रष्टाचाराविरुद्ध आणि अनियमिततेविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.

हेही वाचा- Maharashtra Cabinet Decision : राज्य सरकारची रायगडात खासगी विद्यापीठाच्या विस्तारासाठीच्या जमिनीला मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय h

IAS तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द-

  • ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
  • सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
  • जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
  • मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग.
  • जुलै 2009 – सीईओ, वाशिम.
  • जून 2010 – सीईओ, कल्याण.
  • जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना.
  • सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
  • नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी.
  • मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
  • मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
  • फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका.
  • नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन.
  • डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
  • जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका.
  • ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
  • जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
  • सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
  • एप्रिल 2023 – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • जून 2023 – सचिव मराठी भाषा विभाग
  • जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
  • जून 2024 – विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग
  • ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय
  • मार्च 2026 – प्रधान सचिवआपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग
  • आता – अन्न आणि औषध प्रशासनया संवेदनशील विभाग
     

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version