मुंबई म्हाडाच्या अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल…

मुंबई म्हाडाच्या अध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा दाखल…

मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूणमधील शैक्षणिक संस्थेत काम करणा-या महिलेने ही तक्रार नोंदवली आहे.

लग्नाचे आमिष देत तब्बल १४ वर्षे एका महिलेची शारीरिक आणि मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी मधु चव्हाण यांच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षे दाद मागूनही पीडित महिलेची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयाने मधु चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, याप्रकरणी मधू चव्हाण यांनी आरोप करणारी महिला वारंवार खोट्या तक्रारी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version