महाराष्ट्राला ओखी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता; कोकणातल्या समुद्राचं रौद्र रूप

महाराष्ट्राला ओखी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता; कोकणातल्या समुद्राचं रौद्र रूप

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर जाणवू लागलाय.

कोकणातल्या समुद्रांनी रौद्ररूप धारण केलंय. त्यामुळे मालवणच्या समुद्रात पोलिसांची गस्तीनौका बुडालीये.

मालवण बंदरात सिंधू 5 ही गस्तीनौका उभी होती. लाटांच्या तडाख्यानं बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाल्याची माहिती मिळतेय.

पाणी जास्त असल्यानं नौका बाहेर काढण्यास अडचणी येताहेत. पाणी कमी झाल्यानंतर नौका बाहेर काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version