…म्हणून त्याने टोल कर्मचाऱ्यावर चाकूने वार केले; वरळी सी-लिंकवरील थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

…म्हणून त्याने टोल कर्मचाऱ्यावर चाकूने वार केले; वरळी सी-लिंकवरील थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

टोल चुकवायचा म्हणून चालकानं चक्क टोलवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यावरच धारधार चाकूनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

 

मुंबईतील वरळी सी-लिंकवर काल संध्याकाळी ही घटना घडली. टोल तोडून जात असल्याने इनोव्हा कारला थांबवण्यात आले. मात्र, टोल चुकवण्याच्या हेतूनं चालकानं अमोल चौहान या उपस्थित कर्मचाऱ्यावर चाकूनं हल्ला केला.

 

यात कर्मचारी जखमी झाला असून लीलावतीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर,इनोव्हाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version