चंद्रपुरात अवघ्या आठवडाभरात दुसरा पूर

चंद्रपुरात अवघ्या आठवडाभरात दुसरा पूर

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूर – महापूर देखील येऊन गेल्याच्या घटना घडला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. त्यातच चंद्रपुरात धो – धो पाऊस सुरु असून आवठवड्याभरात चंद्रपुरात दुसरा पूर आला आहे. पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला बुधवारला आरेंज तर गुरुवारला रेड अलर्ट जारी केला होता. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यात इरई धरणाचे दोनदा तीन दरवाजे उघडल्याने चंद्रपूर शहरातील सकल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरात पाणी शिरले. अनेकांनी घराचा छतावर आश्रय घेतला. आतापर्यंत जवळपास १००० लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

शहरातील राजनगर, सहारा पार्क आणि सिस्टर कॉलनी,ओंकार नगर, रहमत नगर ,बिंबा गेट, पठाणपुरा गेट, वडगांव अश्या अनेक परिसरात इरई नदीचे पाणी शिरले आहे. या भागात असलेल्या घरांना ८ ते १० फूट पाण्याचा वेढा आहे. इरई धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाची लोकांना राजनगर-सहारा पार्क भागातून बचाव कार्य करण्यास सुरवात केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version