सायन्स एक्स्प्रेस नागपुरात मुक्कामी

सायन्स एक्स्प्रेस नागपुरात मुक्कामी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती असावी या उद्देशानं केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकारानं तयार करण्यात आलेली

सायन्स एक्सप्रेस सध्या नागपूरमध्ये मुक्कामी आहे.  

 

यंदा या ट्रेनचे नववं वर्ष आहे. या सायन्स एक्स्प्रेसने आतापर्यंत 1 लाख 52 हजार किलोमिटरचा प्रवास केला. 

 

सर्वाधिक काळ चाललेले विज्ञान प्रदर्शन म्हणून या सायन्स एक्स्प्रेसची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. 

 

या वर्षीचा “क्लायमेट ॲक्‍शन स्पेशल’ अशी थीम आहे. विद्यार्थ्यांना वातावरणातील बदल सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version