शिक्षक संपावर गेल्याने शाळा ओस पडल्या

शिक्षक संपावर गेल्याने शाळा ओस पडल्या

राज्यात गेल्या चार दिवसांपासून शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी संप सुरू आहे. याचा थेट फटका शालेय विद्यार्थांना आणि पालकांना बसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ३८६ शाळा असून त्यात ३ हजार ४६६ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारल्याने जिल्ह्यातील बहुतांश शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत. यामुळे मुलांचं नुकसान होत आहे. मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांची चिंता वाढलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version