मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : मागच्या दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातील विविध ठिकाणाचे रस्ते जलमय झाले असून नद्या ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत २० जुलैला शाळांना सुट्टी जाहीर केली होती.
मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी २१ जुलै रोजी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं बंद राहतील, असे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे गुरुवारीही मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांनाही (शुकवार) २१ जुलैला प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना उद्या शुकवारी २१ जुलैला शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २० ते २३ जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तत्काळ सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शुक्रवारी २१ जुलै रोजी सुट्टी मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.