मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटीवरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या महाराष्ट्र सरकारने सोमवारी विधानसभेत सांगितले की, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा ‘मकोका’ (MCOCA) लागू करण्याच्या शक्यतेची तपासणी केली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात झालेल्या टीईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून राजीनाम्याची मागणी होत असलेले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात निवेदन दिले. त्यांनी अशीही घोषणा केली की, टीईटी आणि इतर राज्यस्तरीय परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या पद्धती निश्चित करण्यासाठी सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करेल. टीईटी प्रश्नपत्रिका फुटीवर लोकसभेत निवेदन देताना भुसे म्हणाले की, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. तर एक विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे.
टीईटी परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने तयारी सुरू केली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली आहे. टीईटी पेपर फुटीबाबत माहिती मिळतात, पेपर विक्री करण्सासाठी येणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे टीईटीचे पेपर आढळले. राजू प्रयाग शाम आणि आणखी दोघांवर भिवंडी कोनगाव येथे गुन्हा दाखल केला आहे. मोठी रक्कम घेऊन हे पेपर विक्री करणार होते. गुन्ह्यात 3 आरोपींना 27 तारखेला अटक केली आहे. पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे यांची एसआयटी स्थापन केली आहे. हरियाणा, बिहार आणि दिल्लीला तपासासाठी पथके रवाना झाले आहे. या प्रकरणात मकोका लावण्याच्या संदर्भात तपासणी सुरु आहे. आता फेर पेपरसाठी कोणताही शुल्क घेतला जाणार नाही. पुढील परीक्षा पारदर्शक आणि ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.