शाळेच्या बसला आग

शाळेच्या बसला आग

साताऱ्यात खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. शालेय मुलांना घेऊन जात असतानाच ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे ही घटना घडली असून चालकाने प्रसंगावधान दाखवत मुलांना गाडीपासून दूर केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे यात मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथे ही घटना घडली. आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत नेत असतानाच गाडीने अचानक पेट घेतला. या गाडीमध्ये 8 ते 10 विद्यार्थी होते.

शाळकरी मुलांच्या वाहनांना आग लागण्याच्या आजवर अनेक घटना समोर आल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी पैसे वाचवण्यासाठी एका बसची अथवा रिक्षाची जितकी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवले जाते. त्यामुळे वाहन पलटी होणे अथवा आग लागण्याच्या घटना घडत असतात. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाडीला आग का लागली?, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, सीएनजीवर चालणारे हे वाहन असल्याची माहिती आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version