शाकाहाराच्या वादानंतर पुणे विद्यापीठानं सुवर्णपदकच रद्द केले

शाकाहाराच्या वादानंतर पुणे विद्यापीठानं सुवर्णपदकच रद्द केले

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

ज्येष्ठ किर्तनकार शेलारमामांच्या नावाचं सुवर्णपदक तूर्तास रद्द केल्याचं पुणे विद्यापीठानं जाहीर केलंय. फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांनाच हे सुवर्णपदक दिलं जाईल अशी पुणे विद्यापीकडून ठेवण्यात आली होती.

या फतव्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता विद्यापीठानं सुवर्णपदक तूर्तास रद्द केलंय.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध केले होते. केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट यात घालण्यात आली होती.

या प्रसिद्धी पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आलीय. या पत्रकानुसार विज्ञानेतर शाखेचा विद्यार्थीच या पदकासाठी पात्र असणाराय.. तसंच विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत प्रथम किंवा द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण आसावा.. त्यानं भारतीय आणि परदेशी क्रीडा स्पर्धांत जास्तीत जास्त पारितोषिके मिळवलेली असावीत. रक्तदान, श्रमदान, पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण कार्य, साक्षरता आणि स्वच्छता मोहीम तसेच एड्सविरोधी मोहिमेमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग असावा, अशीही अट घालण्यात आलीय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version