कामगाराच्या चलाखीने लाखोंचे नुकसान बचावले; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

कामगाराच्या चलाखीने लाखोंचे नुकसान बचावले; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिवंडी पद्मानगर भागात चोरीची घटना घडलीय. एका ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची दृश्य़ सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मागील चार दिवसांत दोन सोनसाखळी चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. तर आता एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालाय. यापैकी सोनसाखळी आणि ज्वेलर्स दरोडा प्रकरणाचे सीसीटीव्ही हाती लागले आहेत.

आनंद ज्वेलर्समध्ये पहाटे चार वाजताच्या सुमारास एक दरोडेखोर बाहेरील शटरचे  कुलूप तोडून आत प्रवेश करतो. परंतु त्याच वेळी दुकानातील कामगाराने आरडाओरडा केल्याने दुकानात शिरलेला दरोडेखोर आल्या पावली माघारी पळून निघून जातो. चोरट्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version