‘सावरकरांचा मुद्दा सध्या गैरलागू’

‘सावरकरांचा मुद्दा सध्या गैरलागू’

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या नागपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेच्या नागपूर उपकेंद्रासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. त्यानंतर शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गडकरी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची पत्रकार परिषदही झाली. शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील शेती क्षेत्रातील समस्यांसोबतच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विधानावरून मोठे विधान केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही. याचा अर्थ त्यांना महत्त्व नाही असे नाही. देशासाठी त्यांनी केलेला त्याग व समर्पणाला तोड नाही. आपल्याला प्रगतिशील विचारांचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणारे सावरकरही स्वीकारावे लागतील. “गाय हा एक उपयुक्त पशू आहे’ असे सावरकर म्हणाले होते, तर पतित पावन मंदिरात पूजेसाठी त्यांनी वाल्मिकी समाजाचा पुजारी नेमला होता, हेही सावरकर स्वीकारले पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी तुम्ही आणि राहुल गांधी सावरकर या विषयावर कधी काय बोलला होता का? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, राज्यातील आणि देशातील अनेक महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत. त्यावर लक्ष घालण्याची गरज आहे. या मुद्द्यावर आमच्यामध्ये चर्चा होते, आणि झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अनेक प्रश्न आहेत, मात्र सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version