काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांचा भाजपामध्ये प्रवेश

काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांचा भाजपामध्ये प्रवेश

विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली महाजनादेश यात्रा कराड मध्ये होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्यजित देशमुख यांनी प्रवेश केला आहे.

सत्यजित देशमुख यांचा भाजप प्रवेश

सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता.सत्यजित यांचे वडील आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाल्यापासूनचं त्यांच्या मुलाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.

वडिलांच्या निधनानंतर सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यामुळे ही चर्चा होत होती. ‘शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख यांच्यावर अन्याय केला. त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप त्यांनी केला होता.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित देशमुख यांचे भाजपात स्वागत केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version