जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
हुसेन बोल्ट या जागतिक किर्तीच्या धावपटुला आपण धावतांना आणि जागतिक रेकॉर्ड करतांना पाहीलय.पण साता-याच्या म्हसवडमध्ये सुद्धा असेच, एक वेगवान धावणारे हुसेन बोल्ट आहेत. हुसेन बोल्ट अर्थात दादुभाई मुसा हे 50 मिटर अंतर फक्त 9 सेकंदात पूर्ण करतात. दादुभाई मुसा यांच वय आहे 75 वर्ष आहे.
हे 75 वर्षांचे दादुभाई मुसा एवढ्या वेगाने धावतात की तरुण सुद्धा थक्क होतील. मुसा यांना धावण्याच वेढ खुप पुर्वी पासुनच आहे. परंतु त्यांच्या धावण्याचा सरावाकडे फारस कोणाचं लक्ष नव्हतं आणि जी मंडळी दररोज यांचा सराव बघायची त्यातली बरीच मंडळी या म्हाता-याला वेड लागलय का अस म्हणायची. तीच मंडळी आज त्यांचे कौतुक करतयं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.