जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
तुमचं तुमच्या मुलावर लक्ष आहे का? कारण या बातमीनंतर तुमच्या पायाखालची जमीन हल्ल्याशिवाय राहणार नाही. साताऱ्याच्या खटाव
तालुक्यात देखाव्याचे अनुकरण करण्याच्या नादात एका विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. 13 वर्षीय सुमीत शिंदे रविवारी गणपती
मंडळात दर्शनासाठी गेला होता.
येथील गणपतीला शेतकरी आत्महत्तेचा देखावा ठेवण्यात आला होता. त्या देखाव्याचे अनुकरण करण्याच्या
नादात सुमीतलाच गळफास बसला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. या घटनेमुळे आपल्या मुलांवर
लक्ष ठेवण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.