जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
रंगारींनी गणपती बसवला हे कोणीच अमान्य करु शकत नाही. लोकमान्य टिळकांनी त्याचा प्रसार केला. त्यावेळी लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी एकत्रच होते. असं वक्तव्य पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलं.
भाऊ रंगारी मंडळ आणि महापौर यांच्यात झालेल्या खासगी बैठक झाली. याबाबतचं संभाषण भाऊ रंगारी मंडळाकडून पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आलं. जे वक्तव्य महापौर मुक्ता टिळक यांनी बैठकीत केलं ते जाहिररित्या करावं अशी मागणी भाऊ रंगारी मंडळाकडून करण्यात आलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.