Sarangkheda Horse Market : अपार लोकप्रियता, करोडोंची किंमत आणि राजेशाही थाटामुळे सध्या होतेयं फक्त सारंगखेड्यातील ‘ब्रम्होसची’च चर्चा

सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमध्ये गुजरातचा मारवाडी घोडा ‘ब्रम्होस’ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. देसाई स्टडफॉर्मवरील प्रीमियम संगोपनामुळे त्याची मागणी देशभरात वाढली आहे.
Sarangkheda Horse Market : अपार लोकप्रियता, करोडोंची किंमत आणि राजेशाही थाटामुळे सध्या होतेयं फक्त सारंगखेड्यातील ‘ब्रम्होसची’च चर्चा

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलमध्ये यंदा असा एक स्टार घोडा विक्रीसाठी आला असून संपूर्ण बाजारात क्षणात खळबळ उडाली. गुजरातमधून आलेला मारवाडी जातीचा ‘ब्रम्होस’ जसा मैदानात उतरला, तसा त्याच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी उसळली. तब्बल 15 कोटी रुपये किंमत असल्याची चर्चा असलेल्या या घोड्याने क्षणार्धात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काळा रंग, कपाळावर पांढरी पट्टी आणि अंगावरूनच झळकणारी राजेशाही ठेवण ‘ब्रम्होस’ पाहताच हा साधा घोडा नसून एक ‘अश्वसम्राट’ आहे, याची जाणिव होते. गुजरातचे नागेश देसाई यांच्या देसाई स्टडफॉर्मवर या घोड्याचे जन्मापासून प्रीमियम पद्धतीने संगोपन करण्यात आले आहे.

फेस्टिव्हलमध्ये त्याची शोभा पाहून अनेकांनी बोली लावायला धाव घेतली. पुष्कर बाजारातदेखील त्याच्यासाठी 8 कोटी रुपयांची बोली लागली होती, तरीही देसाई कुटुंबाने ‘ब्रम्होस’ विक्रीला ठाम नकार दिला. केवळ 36 महिन्यांचा आणि तब्बल 63 इंच उंच असलेला हा डौलदार घोडा सध्या देशातील टॉप परफॉर्मन्स घोड्यांमध्ये गणला जातो. त्याच्या रोजच्या देखभालीत 15 लिटर दूध, पौष्टिक खाद्य, मसाज, ग्रुमिंगसाठी स्वतंत्र कर्मचारी आणि खास प्रशिक्षणाचा समावेश आहे.

हेही वाचा: Andhra Pradesh Bus Accident : भयंकर! चित्तूरहून निघालेल्या यात्रेकरूंवर काळाचा घाला; बस अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

त्यामुळे त्याच्या अंगकाठीपासून ते चालण्याच्या ढंगापर्यंत त्याची खासियत दिसून येते. देशभरातील अश्वस्पर्धांमध्ये ‘ब्रम्होस’चा दणदणाट कायम राहिला आहे. अनेक स्पर्धांमध्ये नंबर वन घोषित झाल्याने त्याची मागणी आणि लोकप्रियता दोन्ही झपाट्याने वाढत आहेत. देसाई स्टडफॉर्मवर त्याच्यापासून आतापर्यंत 10 पिल्ले तयार झाली असून या पिल्लांवर लाखोंच्या बोली लागल्या आहेत.

यंदाच्या सारंगखेडा घोडेबाजारात कितीही घोडे आले असले, तरी लोकांचा ओढा फक्त एका नावाकडे, ‘ब्रम्होस’. त्याच्या किंमतीची चर्चा, त्याचा थाट, त्याची परफॉर्मन्स लाइन आणि त्याचा डौल या सर्वांनी मिळून फेस्टिव्हलचे संपूर्ण आकर्षण या एकाच अश्वसम्राटाभोवती केंद्रित झाले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde Ravindra Chavan : महायुतीत ठरलं..! उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी केली मोठी घोषणा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version