सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी प्रथेला बंदी

सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी प्रथेला बंदी

जय महाराष्ट्र, नाशिक

 

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी गडावर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षीपासून बोकडबळीची ही प्रथा बंद करण्यात आली आहे.  

 

गेल्यावर्षी नवरात्रोत्सवानंतर दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देताना मानवंदनेप्रसंगी, हवेत गोऴीबार करताना 12 जण जखमी झाले होते. यामुळे भाविकांची सुरक्षा लक्षात घेत यंदापासून बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 

वर्षानुवर्षाची ही परंपरा बंद करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, श्रध्दा म्हणून पाहणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version