तुकोबाच्या प्रस्थानासाठी देहूमध्ये घूमला माऊलीचा गजर…

तुकोबाच्या प्रस्थानासाठी देहूमध्ये घूमला माऊलीचा गजर…

 

पंढरीच्या वारीसाठी पुण्यनगरी देहूआळंदीमध्ये संततुकोबाच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अनेक भाविक उत्सुक होते या सोहळ्यात राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक वारीचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. संत तुकोबाच्या प्रस्थानाचा हा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

तसेच या सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान गुरुवारी म्हणजेचं आज पार पडला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी प्रस्थान होणार आहे.

या पालखी सोहळ्यासाठी पुण्यनगरी देहूरला सुंदरपणे सजवण्यात आले होते. टाळ – मृदंग आणि माऊलीचा गजर देहूरमध्ये घूमत होता. यंदाच्या अधिक मासामुळे हा सोहळा लांबला आणि त्यामुळे भविक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. तसेच आळंदी देवस्थानतर्फे या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती.

 

आता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन !

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version