बुलढाणा : रविवारी आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेनिमित्त संत नगरी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. विदर्भातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील अनेकांनी गजानन महाराजांना आपले गुरु म्हणून स्वीकारले आहे. गुरूला वंदन करण्यासाठी सकाळपासून शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.