पक्ष सोडून शिवसेनेत जाण्यासाठी पैशांची ऑफर होती; गौप्यस्फोट करत मनसे नगरसेवकाची अँन्टी करप्शनकडे तक्रार

पक्ष सोडून शिवसेनेत जाण्यासाठी पैशांची ऑफर होती; गौप्यस्फोट करत मनसे नगरसेवकाची अँन्टी करप्शनकडे तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पक्ष सोडून शिवसेनेत जाण्यासाठी पैशांची ऑफर होती असा धक्कादायक खुलासा मनसेसह राहिलेल्या एकमेव नगरसेवकाने केला आहे. याबाबत त्यांनी अँन्टी करप्शनकडे तक्रारही केली आहे.  

पक्ष सोडण्यासाठी होती पैशांची ऑफर असा खुलासा मनसेचे नगसेवक संजय तुर्डेंनी केलाय.

संजय तुर्डेंनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.  शिवसेनेत जाण्यासाठी रक्कम देवू केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

अर्चना भालेराव (प्रभाग क्र. 126), परमेश्वर कदम(प्रभाग क्र. 133), अश्विनी मतेकर(प्रभाग क्र. 156), दिलीप लांडे(प्रभाग क्र. 163), हर्षल मोरे(प्रभाग क्र. 189) आणि दत्ताराम नरवणकर(प्रभाग क्र. 197) या मनसे नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

तर, संजय तुर्डे हे एकमेक नगरसेवर पक्षासह एकनिष्ठ राहिले आहेत.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version