‘त्यांनी’ दिलेली पैशांची ऑफर मी धुडकावली; मनसेसोबत राहिलेल्या एकमेक नगरसेवकाचा गौप्यस्फोट

‘त्यांनी’ दिलेली पैशांची ऑफर मी धुडकावली; मनसेसोबत राहिलेल्या एकमेक नगरसेवकाचा गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज ठाकरेंसह राहिलेले मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी लाचलुचपत विभागाकडे आपला जबाब नोंदवला आहे आणि याप्रकरणी पुरावेही सादर केले आहेत.

‘मला दिलीप लांडे यांनी पैशांची ऑफर दिली होती, ती मी धुडकावली’, असा गौप्यस्फोट तुर्डे यांनी यावेळी केला.

‘माझ्याशी कुठल्याही शिवसेनेच्या नेत्याने संपर्क केला नाही. माझ्याकडे असलेले पुरावे मी एसीबीच्या हवाले केले आहेत’, अशी माहिती तुर्डे यांनी दिली.

पुराव्यांच्या आधारावर मनसेशी गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version