पेपरफुटी प्रकरणात ‘भाजयुमो’चा नेता संजय सानपला अटक

पेपरफुटी प्रकरणात ‘भाजयुमो’चा नेता संजय सानपला अटक

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणी यापूर्वीच बीड जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आह. तसेच याप्रकरणी आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे.

संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू असताना पेपरफुटी प्रकरणी त्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी संजय सानप यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संजय सानप यांना २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे. संजय सानप यांचा मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्यांनी नोकरीला लावले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version