महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वााखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतेक आमदारांनी राज्यातील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. या सगळ्या घडामोडींवर खासदार उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE — Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी राजभवनातील एक फोटो शेअर केला आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गानं जाऊ द्या,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. सध्याच्या घडामोडींबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. ‘माझं आताच शरद पवार यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह पुन्हा सर्व नव्यानं उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असं शरद पवार बोलल्याचं राऊत यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.