सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून संजय राऊत यांचे अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त करण्यात आले आहे. पत्रा चाळप्रकरणी ईडीने कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.
संजय राऊतांच्या संपत्तीवर ईडीची टाच पडली असून ईडीने संजय राऊतांच्या अलिबाग आणि मुंबईतील दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. ईडीने राऊतांच्या आठ जागा जप्त केल्या आहे.
गेल्या काही दिवसांपासून मविआमधील नेत्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. तर मविआमधील अनेक बडे नेते ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून संजय राऊतांवर कारवाई होणार असल्याचा इशारा विरोधकांकडून देण्यात येत होता. दरम्यान, आता प्रत्यक्षात संजय राऊतांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.