राऊतांची राणेंवर टीका

राऊतांची राणेंवर टीका

ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत हे शनिवारी कणकवली येथे आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले आहे. पण याचवेळी त्यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर नितेश राणे, नारायण राणे यांनी आनंद व्यक्त केला पण त्यांच्यावर राऊतांनी ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असे म्हणत राणे पिता-पुत्राला खोचक टोला लगावला आहे.

कणकवली येथून पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी संध्याकाळी हा निर्णय देण्यात आला. निवडणूक आयोगातील पोपटरावांनी परस्पर ठरवून शिवसेनेची मालकी कोणाकडे द्यायची? याचा निर्णय दिला. त्यानंतर कोकणात आणि विशेषतः कणकवलीमध्ये जल्लोष करण्यात आला. याचे काही फोटो देखील पाहिले. या फोटोमध्ये मोजून सात चेहरे होते. यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.. जे शिवसेना आधी सोडून गेले आहेत. ते यांच्याबरोबर फटाके वाजवत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन तुमची शिवसेना वाढणार आहे का? असा म्हणत राऊतांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपच्या गटात देखील आनंद पाहायला मिळाला. कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी फटाके फोडत जल्लोष केला. ज्यामुळे संजय राऊत यांच्याकडून राणेंवर सडकून टीका करण्यात आली. तर ठाकरे गटाला धक्का बसल्यानंतर नितेश राणे यांनी याचे खापर आदित्य ठाकरेंवर फोडले. आदित्य ठाकरेंनी सत्तेत मंत्री असताना नाईट लाईफ सुरु केली, नको त्या गोष्टी केल्या ज्यामुळे आज जे काही घडले ते चांगले घडले असल्याचे ते म्हणाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version