जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बुलेट ट्रेनच्या वेगानं मराठा आरक्षणावर न्याय द्या अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारकडे केली.
मराठा समाजाच्या मागण्या न्याय्य असून मुख्यमंत्री वेळकाढूपणा करत असल्याचं संजय राऊत म्हणाले.
मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे लोक रस्त्यावर उतरले मात्र त्यांच्यासाठी सरकारला वेळ का नाही असा सवालही त्यांनी या वेळी केला.
तसंच मुख्यमंत्री फडणवीस यांचा कारभार पारदर्शी आणि स्वच्छ आहे. मग त्यापद्धतीनं मंत्र्यांची मालमत्ताही जाहीर केली पाहिजे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.