संजय राउत यांची जैन मुनीवर टीका !

संजय राउत यांची जैन मुनीवर टीका !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एका आध्यात्मिक गुरूवर शिवसेनेने टिकेचे अस्त्र उपसले आहे. संजय राउत यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या

व्हिडिओमध्ये आध्यात्मिक गुरु सुर्यसागर पिस्तुल घेवून गोळी झाडताना दिसत आहे. 

 

गुरू सूर्यसागर हे भाजप प्रचारक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. स्वतःला जैन मुनी म्हणवून घेणारा हा माणूस शिवसेनेचा

द्वेष करतो आणि भारतीय जनता पक्षाचा पुरस्कार करतो, असा आरोप करत संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. 

 

“अहिंसा परमो धर्म, हाच तो गुजरात मध्ये लपून बसलेला सुर्यसागर. स्वतःला जैन मुनी म्हणवून घेणारा हा माणूस

शिवसेनेचा द्वेश करतो व भारतीय जनता पक्षाचा पुरस्कार करतो. शिवसेनेस अहिंसा शिकवतो व स्वतः शिवराळ भाषा वापरतो. धमक्या

देतो. बंदूक बाळगतो. जैन धर्म व वर्धमान महावीराना बदनाम करण्याचाच हा प्रकार. मित्रवर्य भाजपाचे हे प्रचारक आहेत. माझ्या

त्यांना शुभेच्छा…” अशा शब्दात संजय राउत यांनी या जैन गुरुवर टिका करत फेसबुकवरुन पोस्ट केली आहे. 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version