जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय.. शेतकऱ्यांच्या व्यथेचं राजकारण करतंय, अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली.
शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषदमध्ये ही टीका केली.
शिवसेनेने उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 19 मे रोजी नाशिकमध्ये शेतकरी अधिवेशन आयोजित केले.
सत्तेत असलो तरी आम्ही सध्या देणाऱ्यांच्या नव्हे तर मागणाऱ्यांच्या भूमिकेत आहोत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उध्दव ठाकरेंच्या नेत्वृत्वाखाली पावसाळी
अधिवेशनादरम्यान शिवसेना विधानसभेवर निर्धार मोर्चा काढणार आहे. तर कर्जमुक्तीसाठी आरपारची लढाई लढणार असं संजय राऊत यांनी म्हटले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.