वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना सीबीआय कोर्टाने समन्स बजावला आहे.
अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांना सीबीआयने हा समन्स बजावला.
तसेच 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आरोपी आहेत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय
कटियार, विष्णू हरी दालमिया, साध्वी ह्ररितांबरा, महंत नृत्य गोपालदास, महंत राम विलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा चंपतराय बन्सल, महंत धरमदास, सतीश प्रधान
अशा दिग्गाजांच्या नावं या खटल्यात आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.