मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.
‘उत्तर भारतीय लोकांमुळे मुंबई सुरू आहे, जर उत्तर भारतीयांनी एक दिवस काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल’ असा इशारा संजय निरुपम यांनी दिला.
नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे वक्तव्य केलं.
- लक्षात ठेवा उत्तर भारतीय वर्ग महाराष्ट्र चालवतो, मुंबईला चालवतो.
- दूध, भाजी, वर्तमानपत्र विकून आणि ऑटो टॅक्सी चालवून उत्तर भारतीय समाजच मुंबईकरांचे जीवन चालवतो.
- उत्तर भारतीय समाज स्वतःच्या खांद्यावर मुंबईकरांचे ओझे वाहतो.
- जर एके दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवलं की आज कामावर जायचं नाही आणि फक्त एक दिवस काम केलं नाही तर पूर्ण मंबई ठप्प होईल.
- मुंबईच्या लोकांना जेवायलाही मिळणार नाही. आमची तशी इच्छा नाही, असं त्यांनी म्हटलंय.
- गुजरातमध्ये लहान मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत.
- बलात्काराच्या आरोपात अटक केलेली व्यक्ती उत्तर भारतीय आहे. त्यामुळे सर्व उत्तर भारतीयांना दोषी मानणं चूक आहे.
- आज जर पंतप्रधानांच्या राज्यात उत्तर भारतीयांवर हल्ले होणार असेल तर याद राखा एके दिवशी पंतप्रधानांही बनारसमध्ये जायचं आहे, अशी धमकी निरुपमांनी दिली.
तर याच कार्यक्रमात भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं.