Sanjay Kakade's Wife Attempts to Suicide: पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवसायिक व राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उषा काकडे असं संजय काकडे यांच्या पत्नीचं नाव आहे. उषा काकडे यांनी कौटुंबिक कारणास्तव आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर उषा काकडे यांना तात्काळ पुण्यातील रुबी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे रुबी हॉस्पिटलचे प्रमुख अली दारूवाला यांनी सांगितले आहे.
हेही वाचा – तब्बल 150 जखमा, कोणत्या शस्त्रांनी वार झाले? संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा!
उषा काकडे यांचा अनेक सामाजिक उपक्रमांत सहभाग –
उषा काकडे या अनेक सामाजिक उपक्रमांमधून सक्रिय असतात. ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब तसेच गरजू महिलांसाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले आहेत. तथापि, संजय काकडे यांचे राजकीय क्षेत्रात चांगली वर्चस्व आहे. गेल्या पुणे महापालिका निवडणुकीत त्यांनी ते दाखवून दिले होते. संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली होती.
हेही वाचा – मित्राच्या साहाय्याने नवऱ्याने केला बायकोवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला– कपडे धुताना घडलेलं भयानक वास्तव
बांधकाम व्यवसायिक म्हणून प्रसिद्ध असलेले संजय काकडे यांनी 'संजय काकडे ग्रुप' या कंपनीच्या माध्यमातून आपले नाव पुण्यासह महाराष्ट्रात मोठे केले. संजय काकडे यांनी 2017 साली अपक्ष खासदार म्हणून निवडणूक लढवली. यात त्यांना मोठं यश आलं. त्यानंतर संजय काकडे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.