जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजय दत्तचं येरवडा जेलमधलं वर्तन कोणत्या आधारावर चांगलं ठरवलं असा प्रश्नच उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला.
तीन आठवड्यात यावर उत्तर द्या असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी संजय दत्तला मिळालेल्या सवलतीविरोधात याचिका
दाखल केली होती.
एके 47 बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आधीच दीड वर्षांची शिक्षा भोगल्यानं संजय दत्तला साडेतीन वर्षच जेलमध्ये राहायचं
होतं. पण त्यातही तो पॅरोल आणि फर्लोवरच बाहेर होता. 3 महिन्यांपेक्षाही जास्त काळ संजय दत्त पॅरोल आणि फर्लोचा लाभ घेऊन जेलबाहेर होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.