…म्हणून संजय दत्तला लवकर सोडलं; राज्य सरकारची कोर्टात माहिती

…म्हणून संजय दत्तला लवकर सोडलं; राज्य सरकारची कोर्टात माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अभिनेता संजय दत्तच्या अडचणी कमी करण्यासाठी आता राज्य सरकार आणि जेल प्रशासन त्याच्या पाठीशी उभे राहिले आहे.

 

संजय दत्त बाबतीत कोणत्याही नियमांचं उल्लंघंन झाले नसून, त्याला जेलमध्ये दिलेली कामे त्याने वेळेत पूर्ण केलीत. तसेच त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा

कमी करण्यात आली होती, असं राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राव्दारे हायकोर्टात स्पष्ट केले.

 

पण, राज्य सरकारच्या या स्पष्टीकरणाला सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी विरोध केला आहे. अशी कोणती कामे आहेत जी संजय दत्त ने वेळेत पूर्ण केली

आहेत? त्याची कोणती चांगली वागणूक होती ज्यामुळे त्याची शिक्षा कमी केली? असा सवाल करत राज्य सरकारच्या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

संजय दत्तची अशी कोणती चांगली वागणूक आहे ते न्यायालयाला तरी कळू द्या असा सवाल विचारुन न्यायालयाने राज्य सरकार आणि जेल प्रशासनाच्या भूमिकेवर

संशय व्यक्त करत दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी ठेवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version