जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
अशी काही क्षेत्र असतात ज्यात फक्त पुरुषांचीच मक्तेदारी चालते. मात्र, आत तिथेही महिला अग्रेसर असलेल्या पाहायला मिळतायत.
सांगलीतील रेणावी येथील इमताज अजमुद्दीन शिकलगार यांनीही वाहनांची दुरुस्ती करण्याचा व्यवसाय करून पुरुषांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढलीय.
इमताज या गेल्या 10 ते 12 वर्षांपासून दुचाकी, चारचाकी वाहनांचे पंक्चर काढत पतीला मदतीचा हात देत आपल्या संसाराला हातभार लावत आहेत.
पंक्चर काढण्याचा व्यवसाय करतच त्यांनी आपली गृहिणीची जबाबदारीही तितक्याच समर्थपणे पेलली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.