म्हशींच्या शर्यतींचा थरार; विजेत्या म्हशीने पटकावले पाच हजारांचे पारीतोषिक

म्हशींच्या शर्यतींचा थरार; विजेत्या म्हशीने पटकावले पाच हजारांचे पारीतोषिक

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

म्हशींच्या शर्यतींचा थरार सांगलीमध्ये पाहण्यास मिळाला.  शहरातील एका हौशी मंडळाने या म्हैस पळवण्याच्या शर्यतींचे आयोजन केले होते.

शहरातील गवळी गल्ली येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. राजमुद्रा ग्रुपच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सांगली, मिरजेसह परिसरातून16 म्हशी सहभागी झाल्या होत्या.

दुचाकीवर म्हैस मालक पुढे व त्याच्या मागे म्हैस पळते, अशा या स्पर्धा पार पाडतात. अर्धा किलोमीटरचे अंतर कमी वेळात पार करण्याच्या या स्पर्धेत प्रथम विजेत्या म्हशीला 5 हजारांचे पहिले बक्षीस देण्यात येते. म्हशींच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी बालगोपाळांपासून अबालवृद्ध मोठया संख्येने उपस्थित होते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version